देऊळगाव राजा : घरगुती भांडणातून कुऱ्हाडीने प्राणघातक हमला, २ जण जखमी झाल्याची घटना देऊळगाव राजा येथील रहेमत नगर येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी ३ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी असलम शहा खलील शहा रा.साखरखेर्डा व त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरुन मागील तिन वर्षापासुन भांडण, झगडा असुन दिनांक 07/09/2024 रोजी फिर्यादीचे सासरे यांनी फोनवर फिर्यादी यांना त्याचे पत्नी व मुलास भेटण्यासाठी देउळगावराजा येथे बोलावले असता निझाम शहा महेमुद शहा, अतीक शहा निझाम शहा, व अदील शहा निझाम शहा सर्व रा.रहेमतनगर, देऊळगाव राजा यांनी संगणमत करुन फिर्यादी चा भाउ अफजल शहा यास आरोपी ने कु-हाड डोक्यात मारुन
जख्मी केले. उजव्या हाताचे कोणीवर मारुन जखमी केले. फिर्यादी चे वडील खलील शहा यांना काठीने मारहाण करुन शिवीगाळ केली व जिवाने मारण्याच्या
धमकी दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल करीत आहे.