Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

2,04,000/- रु.चा देशी विदेशी दारु मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा नोंद

वर्धा : दि.06/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाकडून अवैध धंदे शोध व कारवाईकामी दारूबंदी मोहीम राबवित असताना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि, कानगाव येथे राहणारा शुभम वाघमारे व जितू दलित लडे, दोन्ही राहणार कानगाव ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा हे संगणमताने दारूचा व्यवसाय करीत असुन सदर दारूचा साठा जितू लडे रा.कानगाव, ता.हिंगणघाट याने आपले राहते घरी लपवून ठेवला आहे वरून दोन पंच व पो स्टाफ सह जितू लडे याचे राहते घरी प्रो.रेड केला असता जितू लडे याचे घरझडतीत एकूण 23 खरर्ड्याचे खोक्यात देशी-विदेशी दारूने भरलेल्या एकूण 1104 शिश्या जु.किं. 2,04,000/-रू चा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीविरूध्द पो.स्टे.अल्लीपुर येथे अप.क्र.502/24 कलम 65 ई, 77 अ, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पो.नी. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, सफौ मनोज धात्रत, पो.हवा.नरेंद्र पाराशर, शेखर डोंगरे, अरविंद येनूरकर, नापोशी संगसेन कांबळे, पोशी, विनोद कापसे, मिथुन जिचकार, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, चालक रितेश गेटमे, सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News