देऊळगाव राजा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमूख मागणीसह इतर प्रलंबित मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना च्या वतीने 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यानुसार नगर परिषद देऊळगाव राजा येथील अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत, संपावर जाणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना दिले आहे.
निवेदनावर एम.जे. शहा, आर.बी.जाधव, एस.डी.जाधव, सी.पी.तायडे, व्ही.डी.वाघ, व्हीं.व्हि.शिंगणे, पी.डी.मुंढे, सन्मती जैन, सय्यद नजिर व इतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.