गडचांदूर : 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो, या दिवशी भारताचे महान हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस, या दिवशी संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल मध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना पंचायत समिती चे गट शिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रधानाचार्य सिस्टर दीपा, शाळेचे लोकल मॅनेजर सिस्टर नवीन, शारीरिक शिक्षक प्रीतम चौधरी व जुही शेख हे सुद्धा उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले तसेच या दिवसाचे औचित्य साधून विविध प्रकाराचे खेळ खेळल्या गेले. यामध्ये व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, चेस, लंगडी इत्यादी खेळाचा समावेश होता. तसेच क्रीडा दिनी मशाल पेटऊन विद्यार्थ्यांचा जोश वाढवला, तसेच मागील वर्षात प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शाखेचे प्रमुख आरती सातपुते व डॉ. नाजिया अली यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सपना सेलोकर यांनी केले.