Saturday, May 24, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

केंद्राकडून महाराष्ट्राला 401 कोटींचे थकीत अनुदान प्राप्त!

राज्यातील नगर परिषदांच्या विकासाला मिळणार गती

चंद्रपूर : केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने महाराष्ट्राला मिळणारे सन 2023-24 चे नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांसाठीचे अनुदान थकित होते. सदर अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा एकूण 421 ठिकाणी विविध विकास कार्य रखडलेली होती. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी महाराष्ट्राला सदर निधीची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करून सदरचा निधी महाराष्ट्र राज्याला मिळवून दिलेला आहे.

म्हणूनच महाराष्ट्राचा केंद्राकडे वित्त आयोगाच्या अनुषंगाने सन 2023-24 चा निधी मिळवून नगरपालिका प्रशासन व नगर परिषदांकरिता मिळणाऱ्या अनुदानाचा विषय मार्गी लागावा, असा त्यांचा आग्रह होता. सदरचे अनुदान महाराष्ट्र शासनाच्या विविध नगरपालिका व नगर परिषदांकरिता अत्यंत आवश्यक होते. या निधी अभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगर पालिकामध्ये विविध विकास कार्य रखडलेली होती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयामुळे व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News