Tuesday, June 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अमराई येथे सुरेश पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण

दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल घुग्घुस अमराई येथे स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला.

चंद्रपूर : दिनांक – 15 आगष्ट 2024 रोजी रोजी दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल अमराई घुग्घुस येथे स्वातंत्र दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ध्वजारोहण कार्यक्रमाचा अध्यक्ष पदी सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

78 व्या स्वातंत्र दिवस साजरा होत असताना या दिना निमित्त सफेद झंडा कामगार संघटना, संस्थापक एवं अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शालेय विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका व समस्त अमराई येथील नागरिकांचा उपस्थित राष्ट्रगाण घेण्यात आले.

प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आली.

अतिशय जल्लोषात, भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरयी हो चे नारे लावण्यात आले. सुरेश पाईकराव यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीनी चॉकलेट देऊन त्यांना व सर्व जनतेला स्वातंत्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळेस दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष नागशेन भगत, वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष जगदीश मारबते, महासाचिव योगेश नगराळे, प्रतीमा ठमके बबन वाघमारे विजय कवाडे, शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थीनी व समस्त घुग्घुस अमराई येथील नागरिक उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News