Tuesday, June 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

परभणी : सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा” चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 14 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

कृषी यांत्रिकीकरण या टायटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज करणे साठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थी (शेतकरी) “युजर आयडी व पासवर्ड” टाकावे > “अर्ज करा” या बाबीवर क्लिक करावे > “कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करावे > “मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे > “तपशील” बाबीवर क्लिक करून “मनुष्यचलित औजारे घटक निवड” > “यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे” > “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे व जतन करावे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News