Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थीती- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत साधला संवाद

सिंदेवाही : अविरत मानव सेवेकरिता सदैव तत्पर असलेले व सच्चा जनसेवक म्हणून सर्वदूर परिचित, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सिंदेवाही तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच नोटबुकचे वितरण करण्यात आले.

एकीकडे देशात साक्षरतेसाठी सर्व शिक्षा अभियानाचा सरकार डंका पिटत आहे. मात्र दुसरीकडे प्रचंड महागाई व बेरोजगारीमुळे अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शासनाने शालेय गणवेश, व मोफत पाठ्यपुस्तके योजना कार्यान्वित केली. परंतु बाजारपेठेत उपलब्ध असलेले नोटबुक यांची वाढलेली किंमत लक्षात घेता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. तर राजकारणात समवेतच विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक दायित्व जोपासणारे व सच्चा जनसेवक अशी ख्याती प्राप्त, राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ग्रामीण स्तरावरील गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता मदतीचा हात पुढे करीत सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुके उपलब्ध करून दिली. सदर नोटबुकांचे वितरण सिंदेवाही तालुक्यातील किन्ही, मुरमाडी, सरडपार , नवेगाव, लोनखैरी, चिटकी, फुटकी, मुरपार, गोविंदपुर, मेंढा (माल), चारगाव, येरगाव, डोंगरगाव, पळसगाव, नांदगाव, देलनवाडी, खातगावं, भेंडाळा, लाडबोरी, मिनघरी, रत्नापूर, पेंढरी व तालुक्यातील इतरही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये तथा खाजगी विद्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवानी वडेट्टीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, रमाकांत लोधे, महीला आघाडी अध्यक्षा सिमा साहारे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, ता.युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजित मुप्पिडवार, शहराध्यक्ष प्रीती सागरे, कृउबा संचालक जयश्री नागापुरे, सचिन नाडंमवार, नंदा नरसाळे अशोक संगत, रोशन वारजूरकर, राम कवठे, गणेश हांडेकर, विनीत दहिवले, रूपाली रत्नावार, जनार्दन गावडे, निमंत्रिका कोकोडे, महेश मंडलवार, निकु भुसारे, अक्षय पेटकुले मंगेश मेश्राम तथा सर्व ग्राम कांग्रेस कमिटीअध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News