देऊळगाव राजा : आंतर शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत स्थानिक छञपती श्री शिवाजी महाराज न.प. हायस्कुल दे.राजा च्या दोन खेळाडूनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावुन यश संपादन केले आहे.
तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा व्यंकटेश महाविद्यालय दे.राजा येथे 13 आॕगस्ट रोजी संपन्न झाल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महा.हायस्कुल चे खेळाडू रुषीकेश सखाराम विधाते याने 14 वर्षे वयोगटात 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. तर मुलीमध्ये कु.माधुरी दत्ताञय गाडेकर हिने 17 वर्षे वयोगटात 53 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला.
या दोन्ही ही खेळाडुची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेचे प्राचार्य संजय देशमुख, उप प्राचार्य आव्हाने, तालुका क्रिडा संयोजक राजेश सपाटे तसेच शिक्षक व शिक्षक्तेर कर्मचारी यांनी शाळेचे क्रीडा शिक्षक अनिल दंदाले व खंडागळे व विजयी खेळाडुचे अभिनंदन केले.




