Monday, December 8, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कलकत्ता, बदलापूर अत्याचाराचा महाविकास आघाडी च्या वतीने बस स्टॉप इथे निषेध

कोरपणा (चंद्रपूर) : कलकत्ता, बदलापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार व या घटनेला लगाम घालण्यात तसेच पिळीत कुटुंबीयांना वेळेवर मिळत न करणाऱ्या शासन, प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविरोधात बस स्थानक चौक कोरपना येथे सकाळी 11 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महाविकास आघाडीचे, युवक व नागरिकांनी अत्याचारऱ्यांना फाशी द्या अशी मागणी करीत अकार्यक्षम सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉ.प्रकाश खानके, संभा कोवे, मनोहर चेन्नई, सुरेश मालेकर, भारत चेन्नई, भाऊराव बोर्डे, गणेश घोडे, वाघ भाई, राहुल मालेकर, इस्माईल शेख, राजा बाबू गलगड, रमेश बोर्डे, जम्मुभाई शौकत अली, मोबीन बेग, अनिल गोंडे, रसूल शेख, रवी जुमनाके, कवडू गाताडे, विजय जीवने, शंकर पेचे, शहरातील देशभक्त नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News