कारागृह अधीक्षक सुहास पवार यांनी केले झेंडावंदन…
वर्धा : जिल्हा कारागृहामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी वर्धा कारागृह अधीक्षक सुहास पवार यांच्याहस्ते बंदिस्त बंद्यासमोर ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी बंदिस्त बंदी बांधवांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीत हिंदी सिनेमातील डायलॉग सादर करण्यात आले. त्यानंतर बंदिस्त बांधवांना नास्ता वाटप करण्यात आला. यावेळी वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर उपस्थित होते. तर सुहास नागमोते तुरुंग अधिकारी श्रेणी 2 यांनी परेडचे संचालन केले.
यावेळी जितेंद्र भावसार तुरुंगा अधिकारी श्रेणी 2 संजय वंजारी सुभेदार चंद्रकुमार चामलाटे हवालदार तसेच कारागृह शिपाई अमित कोठेकर, आशुतोष बोंडे, गिरीश निमकर, अतुल जाधव, शरद सरसरी, शंकर वाघमारे, धृवास पठाडे, जगदीश येवले, अमोल कोडापे, प्रफुल पंधरे, प्रमोद पहाडे, कारागृह कर्मचारी व कारागृहातील बंदिस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.