Tuesday, June 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कैंसरग्रस्त रुग्णास काँग्रेसतर्फे आर्थिक मदत…

सावली : तालुक्यातील मौजा डोनाळा येथे कॅन्सरग्रस्त रुग्णास राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे डोनाळा ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तेजराम बोदलकर व युवा जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते भारत रामटेके यांच्या वतीने सदर मदत दिनांक. २१ जुलै २०२४ रोजी देण्यात आली.

मौजा डोनाळा येथील नंदा पांडुरंग गेडाम वय ४८ वर्षे ह्या गरीब भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले, उपचार चालू असताना त्या मृत पावल्या त्यांच्यामागे बराच मोठा परिवार असून कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली, उपचारासाठी खूप मोठा खर्च आला व कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.

आर्थिक मदत देताना सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व्याहाड खुर्द केशव भरडकर, ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, ग्राम काँग्रेस कमिटी सोनापुरचे डोमाजी शेंडे, युवा काँग्रेस पदाधिकारी अविनाश भुरसे, ज्ञानदेव बारसागडे, संजू येलके, प्रकाश मेश्राम, रेवण बांबोळे, श्रीनिवास कोटगीलवार, आशिष वासेकर, सीताराम सोयाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News