गरजू महिलांना साडी वाटप
घुग्घुस : शहराचे लोकप्रिय नेते स्व.पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, १८ जुन रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी स्व.पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच मौन श्रद्धांजली देण्यात आली आणि आपले विचार व्यक्त केले.
स्व.पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गरजु महिलांना ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे साडी भेट देण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, साजन गोहने, अमोल थेरे, सुरेंद्र जोगी, कोमल ठाकरे, प्रवीण सोदारी, धनराज पारखी, कुसुम भगत, ताई कामतवार, सोनाली कामतवार, सुहासिनी मांढरे, सोनी खेडेकर, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, पियुष भोंगळे, संदीप तेलंग, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती.




