Monday, December 8, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर : जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथीय असलेबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून आपले माहितीचे आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News