लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन हायअलर्ट वर
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिका-यांनी निर्गमित केले आहेत.
अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिका-यांनी आदेश पारीत करताच चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, नागभीड, ब्रम्हपूरी, कलम 56 (1)(अ)(ब) मपोका अन्वये सहा महिन्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण 13 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली असून यात वरील सात गुन्हेगार आणि घुग्घुस, चंद्रपूर, यांना कलम 56 (1)(अ)(ब) मपोका अन्वये 6 महिने व 1 वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम (वरोरा), सुधाकर यादव (चंद्रपूर), दीपक साखरे (राजुरा), दिनकर ठोसरे (ब्रम्हपूरी), तसेच उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे (वरोरा), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा), संदीप भस्के (ब्रम्हपूरी) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक आसिफराजा (बल्लारपूर), अनिल जिट्टावार (ब्रम्हपूरी), विजय राठोड (नागभीड), सुनील गाडे (रामनगर, चंद्रपूर) आणि श्याम सोनटक्के (घुग्घुस) यांच्यावतीने करण्यात आली आहे.




