अमरावती : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज सोमवार, दि. 1 एप्रिल रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. दरम्यान 16 व्यक्तींनी 21 नामनिर्देशन अर्जांचे उचल केली.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.