राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रेम जरपोतवार प्रथम
चंद्रपुर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २० मार्च २०२४ पर्यंत राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी उत्कर्ष महोत्सवामध्ये विविध राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाला महाराष्ट्रातील १५ विद्यापीठांचे विद्यार्थी सहभाग झाले होते. यावेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूरचा विद्यार्थी प्रेम जरपोतवार याने गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नाट्यलेखक, दिग्दर्शक योगेश सोमन, व्ही.एल.कुलगुरू माहेश्वरी यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देत प्रेम जरपोतवार याला सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणाने उत्कर्ष महोत्सवाचा समारोप झाला.
प्रेमच्या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र.कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ.श्याम खंडारे, प्राचार्य डॉ.जयश्री कापसे, डॉ.विजया गेडाम, संघनायक डॉ.राजकुमार मुसने, यांनी अभिनंदन केले आहे.