मुंबई : रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषदेची देशाच्या निर्यातीत महत्त्वपूर्ण भूमिका असून हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेशबैस यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित रत्ने व दागिने आभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
सन २०२२-२३ या वर्षातील उत्कृष्ट रत्ने आणि दागिने निर्यात कामगिरी व योगदानाबद्दल ‘रोझी ब्लू’चे व्यवस्थापकीय संचालक रसेल मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशसेवेबद्दल त्यांचे व इतर सर्व पुरस्कार विजेत्यांचे राज्यपाल बैस यांनी अभिनंदन केले.
यावेळी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, पुरस्कार समितीचे निमत्रंक मिलन चोक्सी, भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.




