चंद्रपूर : पणन हंगाम 2023-2024 खरीप मधील शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, जिल्हयातील धान खरेदी मागील हंगामाच्या तुलनेत चालु हंगामामध्ये कमी प्रमाणात झालेली दिसून येत असल्यामुळे शासन निर्णयानुसार धान खरेदी करिता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. शासनाकडून प्राप्त उद्दिष्टाएवढी व शेतकरी नोंदणीच्या प्रमाणात धान व भरडधान्य खरेदी न झाल्यामुळे शासनाकडून धान व भरडधान्य खरेदीकरिता 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन मुदतीत धानाची विक्री करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.
धान व भरडधान्य खरेदी करीता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com