शरद पाईकराव, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, घुग्घुस
घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून राजेश बोरकर जिल्हा प्रभारी, प्राध्यापक सोमजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव, धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक.4 मार्च 2024 रोजी शरद मल्हारी पाईकराव VBA घुग्घुस शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ क्र. 01 दिनांक. 15 फेब्रुवारी 2024 रोजी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते की, विद्या टॉकीज मागे (वार्ड नं.6) प्रभाग क्रमांक 10 घुग्घुस येथील नझुल जागेवर खुप मोठ्या प्रमाणात भंगाराचे दुकान उभारण्यात आले असुन आजुबाजुला पडीत जागेवर सुद्धा या भंगार दुकानदाराने खाली बोटल व इतर सामान परिसरात ठेवले आहे. त्या पडीत जागेवर भंगार मधील तांबाचे केबल जाळून मोठ्या प्रमाणात तेथील वातावरण हे प्रदूषित करतात. त्या प्रदूषणाचा त्रास तिथल्या स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून विद्या टॉकीज मागील भंगार दुकान हटवुन ती जागा गोरगरीब किंवा गरजु नागरिकांना देण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहराचा माध्यमातून करण्यात आली होती.
परंतू अजुनही नगर परिषद घुग्घुसचा माध्यमातून भंगार दुकानावर कसलीही कुठलेही दखल घेतलेली नाही. अहोरात्र भंगार दुकान मध्ये काही ठोक ठाक करण्याचे आवाजाने नागरिकांमध्ये ध्वनी प्रदुषण निर्माण होऊन त्यांना मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. येत्या 15 दिवसात भंगार दुकान हटवून ती जागा गोरगरीब नागरीकांना उपलब्ध करून देण्यात यावी. हि मागणी लवकरात लवकर पूर्ण न केल्यास आम्हाला तीव्र भूमिका घेऊन नगर परिषद घुग्घुस, चा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार हे नगर परिषद घुग्घुस व शासन प्रशासन राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देखील यावेळेस निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
निवेदन सादर करतांना, वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष, शरद मल्हारी पाईकराव, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे महासचिव, अशोक भगत कोषाध्यक्ष, राकेश पारशिवे संघटक, आशिष परेकर आयटी सेल, प्रमुख नकुल निमसटकर सदस्य, राकेश कातकर सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.