Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’, मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम : सौरभ कटीयार

अमरावती : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि.26 मार्चला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर “चुनाव की पाठशाला” हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. मतदार जनजागृती करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार केले आहेत.

मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप कक्ष’ अर्थात पद्धतशीरपणे मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावागावात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यातील 2 हजार 699 मतदान केंद्रावर ‘चुनाव की पाठशाला’ हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करणे, यांच्या समस्यांची निराकरण करणे, त्यांचे मतदार यादीतील नाव, त्यांचे मतदान केंद्र, त्याचबरोबर मतदान करण्याची पद्धत आणि त्यांच्या मतांचे मूल्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व केंद्रावर एकाच दिवशी राबवणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र जागृती कक्षा मधील प्रतिनिधी, कॉलेज कॅम्पस अँबेसिडर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्याचबरोबर ‘द पिंक फोर्स’ मधील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, महिला बचत गटांच्या महिला इत्यादी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमांची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावरून आणि तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकारी काही मतदान केंद्रांना भेटी देणार असून ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मतदार जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी दिली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News