Tuesday, May 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

07- अमरावती लोकसभा मतदार संघात आज एका उमेदवाराचे चार नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज एका उमेदवाराकडून चार नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. उमेदवाराचे नाव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे. वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात 4 नामांकन अर्ज दाखल केले.

आज दि. 30 मार्च रोजी 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात 58 लोकांमर्फत 95 नामनिर्देशन पत्र उचल झालेले असून 04 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे.

4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि.6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News