Tuesday, May 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

30 बेडचा दवाखान्याचे काम नकरण्यासाठी पैसा का रोखला? काम पूर्ण करुन दवाखाना चालु करा, अन्यथा आंदोलन करु : शरद पाईकराव

घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहराचा माध्यमातून दिनांक. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य, प्राध्यापक सोमाजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव, धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांच्या नेतृत्वामध्ये सार्वजनिक बाधकाम विभाग चंद्रपूर, अभियंता, शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, वैद्यकीय महाविद्यालय डिन मिलिंद कांबळे, पूनम वर्मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग चंद्रपूर, यांना निवेदन देण्यात आले.

घुग्घुस शहर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखले जातो. या घुग्घुस शहरामध्ये पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असुन घुग्घुस शहरात सध्या स्थित असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा दवाखाना सहा बेड चा असुन घुग्घुस येथील नागरिकांना दवाखान्याच्या सोयी सुविधा पुरत नसल्याने घुग्घुस येथील रुग्णांना रेफर केल जाते. व घुग्घुस जवळ पास गावातील सुध्दा रुग्ण घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. हा दवाखाना सहा बेड चा असल्याने. घुग्घुस व जवळ पास खेळ्यातील नागरीकांना खुप मोठा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे. आणि ज्यांनी कोणी फंड रोखण्याचे काम केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव हे म्हणतात की आमदार, चषक, खासदार चषक, या कामासाठी यांच्या कडे फंड मिळतो. परंतु आरोग्याच्या महत्त्व पुर्ण कामासाठी यांच्या कडे फंड नाही. असा आमदार व खासदार जनतेचा कोणत्या कामाचा. हि मागणी करत असतांना रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था व प्रसाधनगृह स्तानगृहाची व्यवस्था करून देण्यात यावे. ही सुद्धा मागणी करण्यात आली. जर का या विषयावर शासन प्रशासन यांनी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तर वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, व कार्यकारी अभियंता विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम शासन व प्रशासनाचा विरोधात तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाईचे जिम्मेदार हे शासन, प्रशासन राहील. तरी सुद्धा लवकरात लवकर अपुर्ण काम सुरू करण्यात यावे. आम्ही आशा करतो की आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असी वेळ आपण येऊ देणार नाही. आपण ह्या दवाखान्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन दवाखाना सुरू कराल अशी आशा व्यक्त करतो. असा देखील इशारा देण्यात आला.

यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड.अक्षय लोकरे, वंचित बहुजन आघडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख विशाल भगत, नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News