घुग्घुस (घुग्घुस) : 30 बेडचा दवाखान्याचे अपुर्ण काम पूर्ण करुन दवाखाना चालु करा अन्यथा आंदोलन करु असे निवेदनाद्वारे मागणी शरद मल्हारी पाईकराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, घुग्घुस तर्फे दिनांक. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य, प्राध्यापक सोमाजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव, धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वामध्ये सार्वजनिक बाधकाम विभाग चंद्रपूर, अभियंता, शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे साहेब वैद्यकीय महाविद्यालय डिन मिलिंद कांबळे, पूनम वर्मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग चंद्रपूर, यांना निवेदनातून मागणी करण्यात आली होती.
कार्यकारी अभियंता पुनम वर्मा सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग यांना निवेदन सादर करतांना घुग्घुस येथील दवाखान्याचे काम का पूर्ण झाले नाही तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, यांच्या सोबत चर्चा केली. घुग्घुस येथील सरकारी दवखान्याचा बांधकामासाठी व विद्यूत पुरवठा करण्यासाठी जो फंड यायचा होता. घुग्घुस येथील सरकारी दवखान्याच्या कामास वेळ लावुन घुग्घुस येथील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे त्यांच्या विश्वासाशी सरकार द्वारे छळ होत आहे. असे अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांनी अभियंता यांना स्पष्ट म्हटले.
घुग्घुस शहर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखले जातो. या घुग्घुस शहरामध्ये पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असुन घुग्घुस शहरात सध्या स्थित असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा दवाखाना सहा बेड चा असुन घुग्घुस येथील नागरिकांना दवाखान्याच्या सोयी सुविधा पुरत नसल्याने घुग्घुस येथील रुग्णांना चंद्रपूर येथे रेफर केला जातो व घुग्घुस जवळ पास खेळे गावातील सुध्दा रुग्ण घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. हा दवाखाना सहा बेड चा असल्याने. घुग्घुस व जवळ पास खेळ्यातील नागरीकांना यांचा खुप मोठा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे.
ज्यांनी कोणी फंड रोखण्याचे काम केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे निवेदनात मागणी केली असता व वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव हे म्हणतात की आमदार, चषक, खासदार चषक, कबड्डी, या कामासाठी यांच्या कडे फंड मिळतो. परंतु आरोग्याच्या महत्त्व पुर्ण कामासाठी यांच्या कडे फंड नाही. असा आमदार व खासदार जनतेचा कोणत्या कामाचा. जो निवडुन तर यांचा मतदानी येतो परंतु निवडुन आल्यावर यांचे तोंड सुध्दा दिसत नाही. हे म्हणत असता अध्यक्ष शरद पाईकराव यांनी आणखी या निवेदनात मागणी केली की जे रुग्णांन सोबत नातेवाईक येतात किंवा रुग्णासोबत राहतात त्यांची राहण्याची व्यवस्था व प्रसाधनगृह स्नानगृहाची व्यवस्था करून देण्यात यावे. ही मागणी सुध्दा यावेळेस करण्यात आली. जर का या विषयावर शासन प्रशासन यांनी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तर वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, व कार्यकारी अभियंता विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम शासन व प्रशासनाचा विरोधात तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल. अशी निवेदनाद्वारे मागणी केली असता, तिन दिवसात ग्रामीण रुग्णालयाचा दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला. हा वंचित बहुजन आघाडी घुग्घुस, तालुका जिल्हा चंद्रपूर, यांचे खुप मोठे यश आहे. ज्यांनी घुग्घुस शहराचा नागरिकांसाठी सातत्याने लढुन हा निधी मंजुर करण्यात आला. घुग्घुस येथील व खेळ्यातील नागरिक वंचित बहुजन आघाडी घुग्घुस अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांचे खुप खुप धन्यवाद माणले.
निवेदन सादर करता वेळेस वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड. अक्षय लोकरे, वंचित बहुजन आघडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख विशाल भगत, नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर, सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.