शरद पाईकराव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घुग्घुस
घुग्घुस (चंद्रपुर) : विद्या टॉकीज मागे (वार्ड नं.6) प्रभाग क्रमांक 10 घुग्घुस येथील खुप मोठा प्रमाणात भंगार दुकान नझुल जागेवरवरती उभारण्यात आले आहे. व आजुबाजुला पडीत जागेवर सुद्धा या भंगार दुकानदाराने खुप मोठ्या प्रमाणात भंगार ठेवले असुन भविष्यात हे जागेवर सुध्दा हळप किंवा ताब्यात घेण्याचा नाकारता येत नाही. गरीब नागरीकांना गरजुना राहण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी जागा मिळत नाही, तरी ते भंगार दुकान हटवुन गोरगरीब किंवा गरजु लोकांना देण्यात यावी. जर का ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा देखील यावेळेस निवेदनातून देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी घुग्घुस च्यामाध्यमातून कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य, सोमजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव, धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पाईकराव VBA घुग्घुस शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव, शहर अध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर, पियांशू कोवले, सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.