घुग्घुस (चंद्रपुर) : ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा विविध संघटनातर्फे सत्कार करण्यात आला.
नुकतीच चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात भाजपा जिल्हा महामंत्रीपदी विवेक बोढे यांची नियुक्त करण्यात आली आहे.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच विविध संघटनातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला लड्डू वाटप करीत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे सिनू इसारप, साजन गोहने, सुनील बाम, अमोल थेरे, हेमराज बोंबले, राजेश मोरपाका, सतीश बोन्डे, किशोर नागतुरे, गणेश कुटेमाटे, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, दिनेश बांगडे, मुस्तफा शेख, सचिन कोंडावार, पिंटू चंदेल, तुलसीदास ढवस, दिलीप कांबळे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, रवी चुने, संदेश पोलशेट्टीवार, नितीन काळे, सुरेंद्र झाडे, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, मिलिंद पानघाटे, पियुष भोंगळे, विशाल नागपुरे, रवी चुने, धनराज पारखी, अनिल मंत्रिवार, राजू रामटेके, नम्मी शेख, कोमल ठाकरे, राकेश फुलझले, सिनू कोत्तूर, अनुप जोगी, श्रीकांत बहादूर, मुकेश कामतवार, अनिल नित, स्वप्नील इंगोले आदी उपस्थित होते.