Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

‘लिडकॉम’ ने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करावेत : अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे

रत्नागिरी : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घ्याव्यात. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी व जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त ‘लिडकॉम आपल्या दारी’ अंतर्गत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आज कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम.सी.ई.डी. मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अपर जिल्हाधिकारी बर्गे म्हणाले, महामंडळाच्या योजनांच्या प्रचार, प्रसिध्दी करण्यासाठी स्थानिक बोली भाषेत प्रचार साहित्य तयार करावे. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत कशा पोहचतील त्याबाबत नियोजन करावे. वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याबाबत लाभार्थ्यांना प्रवृत्त्त करा. तळागळातील घटकांपर्यंत लाभ पोहचवा, असेही ते म्हणाले. भारतीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, विशेष कार्यकारी अधिकारी विजय कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करुन संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुदती कर्ज योजनेचे लाभार्थी स्मिता चिपळूणकर अनिल नेरुलकर यांना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव, कार्यक्रम आयोजक राखी घाडगे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत लांजेकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. व्ही. लोहकरे, ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News