नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतली विवेक बोढे यांची भेट
घुग्घुस (चंद्रपुर) : नगर परिषद कर्मचाऱ्यांनी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या.
नगर परिषदेच्या समावेशनात काही कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.




