Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केले : विवेक बोढे

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती

घुग्घुस : ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्यविस्तार केला त्यांनी आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही अशा सत्तांवर आक्रमणे केली. यातूनच हिंदवी स्वराज्य उभे राहिले. शिवजयंतीनिमित्त मी छत्रपती शिवजी महाराजांना अभिवादन करतो.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, पुजा दुर्गम, अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, वसंत भोंगळे, श्रीकांत सावे, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, अतुल चोखांद्रे, स्वप्नील इंगोले, कोमल ठाकरे, पियुष भोंगळे, मारोती मांढरे, शौर्य बोढे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News