Saturday, May 24, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

चंद्रपूर : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) दि.1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत/क्षेत्रातंर्गत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील. हा आदेश उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि.1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News