घुग्घुस (चंद्रपुर) : ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले शहरात प्रत्येक बुथवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचत आहे. मन की बात कार्यक्रमाला देशभरात जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी भाजपाचे प्रवीण सोदारी, संदीप तेलंग, शुभम वडस्कर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, मोनू हनुमंते, पायल वाडगुरे तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.




