Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी

चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील मतदान केंद्रावरील सुविधांचे निरिक्षण करून आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करण्याचे व या कामात येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल देण्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदाराचे छायाचित्र व नावांची अचूक नोंदणी होत आहे का याबाबत भौतिक पडताळणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या व पात्र व्यक्ती मतदार नोंदीपासून वंचित राहू नये व मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी गौडा यांचेसोबत, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार किशोर साळवे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News