चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालय तसेच मनपा शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
देशाची एकता व अखंडता कायम राहुन वाढीस लागावी या दृष्टीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा स्मृती दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन साजरी करण्यात येते. यानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र तसेच माल्यार्पण करण्यात आले. मनपा कार्यालयात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुख्यालयात सर्व कर्मचाऱ्यांद्वारे व मनपाच्या सर्व शाळांमध्ये उपस्थीत विद्यार्थी – शिक्षकांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेसाठी स्वतःला समर्पित करण्याची व त्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटेमी उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, डॉ.अमोल शेळके, नरेंद्र जनबंधु, विकास दानव, विलास बेले, माधवी दाणी, सिद्दीक अहमद, ग्रेस नगरकर, गुरुदास नवले व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
चंद्रपूर मनपात राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकता दिवस साजरा
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




