घुग्घुस : राजू उंबरकर (नेते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – महाराष्ट्र, नवनिर्माण सेना) यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे पक्षावर असलेला विश्वास, पक्षाच्या कार्याचा प्रभाव, घुग्घुसचे शुभम मैंदलकर, सूरज कळसाई, प्रीतम ठेंगणे, नागेश डोहे, श्रीकांत सोप्पार, नवीन तोटा, श्रीधर कलवेणी, साजिद खान, लकी कोडापे आदींनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्वांच्या गळ्यात दुपट्टा, पुष्पगुच्छ देऊन मनसेत प्रवेश केला.
मनदीप रोडे (जिल्हा अध्यक्ष, मनसे चंद्रपूर व संपर्क अध्यक्ष, मनसे, भंडारा), फाल्गुन गोहोकर (मनसे तालुकाध्यक्ष, वणी, जि. यवतमाळ), सुमित कोहळे (शहर उपाध्यक्ष, घुग्घुस) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला आहे.
रविश सिंग (जिल्हा अध्यक्ष, कामगार सेना, चंद्रपूर) यांनी घुग्घुस यांच्या उभरत्या युवा मनसे प्रवेशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.