स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे अभिवादन
घुग्घुस : ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा हे इंग्रज सरकार विरुद्ध संघर्ष करणारे महानायक होते. भारतीय संस्कृती, सन्मान व भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. महानायक बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य व आदिवासींच्या अधिकाराची मशाल पेटवली हे युगा युगापर्यंत पिढीला प्रेरणा देत राहणार. इंग्रजांविरुद्ध लढतांना अवघ्या २४ व्या वर्षी ते देशासाठी शाहिद झाले. थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो.
यावेळी विशाल पेंदोर, विनोद जुमनाके, रवी टेकाम, जेष्ठ नागरिक राजेश येटा, लक्ष्मण कलवल, अरविंद आगलावे, मंजुषा आत्राम, लक्ष्मी कटकुरवार, रेखा कटकुरवार, सुमन डकरे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, उमेश दडमल, ललिता गाताडे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, कुमुदिनी हनुमंते, पायल वाडगुरे, नेहा कुम्मरवार व नागरिक उपस्थित होते.




