ठाणे : बिहार राज्य (पटना) येथे दि. 23 ते 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु असलेल्या 11वी प्री-टिन, सब-जुनिअर, जुनिअर आखिल भारतीय राष्ट्रीय पेंचाक सिलाट क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये अंबरनाथ च्या भोरे मार्शल आर्ट ऍण्ड स्पोर्ट्स असोसिएशन चे विद्यार्थी कु. अथर्व रोहित धेंडे ह्यांनी 13वर्षीय पुरुष या वयोगटात “सोलो क्रीटीव्ह” या प्रकारात कांस्य पदक पटकावून अंबरनाथ चे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे व ठाणे जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सदर स्पर्धा हि पटना येथील पाटिलपुत्र इनडोअर स्टेडियम येथे संपन्न झाली, असून या स्पर्धासाठी अनेक राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची निवड झाली होती या मध्ये ठाणे ग्रामीण (अंबरनाथ) साठी कु. अथर्व रोहित धेंडे ह्याची निवड झाली होती.
सदर स्पर्धा हि राष्ट्रीय क्रीडा संघटना – इंडियन पेंचाक सिलाट फेडेरेशन द्वारे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बिहार राज्याचे कला, संस्कृति एवं क्रीडा युवा विभाग मंत्री जितेंद्र कुमार राय व बिहार राज्य खेळ प्राधिकरण चे संचालक सहसचिव पंकज कुमार राज आणि इंडियन पेंचाक सिलाट फेडेरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते. कु. धेंडे हे ठाणे ग्रामीण क्षेत्रातून या स्पर्धंस विजेता व सहभाग नोंदविणारे पहिले खेळाडू आहेत या अगोदर अंबरनाथ ला या स्पर्धेस एकही सहभागी व पदक नव्हते. कु. धेंडे यांनी अंबरनाथ चे क्रीडा तज्ञ रोहित भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. या प्राविण्य मुळे कु. अर्थव धेंडे यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे.




