Thursday, May 7, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस येथे युवकाची आत्महत्या!

घुग्घुस (चंद्रपुर) : एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मोहित दिलीप सोनेकर (२८ रा. केमिकल वार्ड, घुग्घुस) हा रविवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रागाच्या भरात घरून निघून गेला.

युवक हा दुचाकी ने घुग्घुस-वणी मार्गावरील वर्धा नदीच्या पूला जवळ गेला व तिथे दुचाकी उभी ठेऊन पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबियांनी सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी मोहित बेपत्ता असल्याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान एका मासेमारी करणाऱ्या युवकाने मोहित याने नदीत उडी घेतल्या बाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना व पोलिसांना दिली.

ठाणेदार आसिफराजा शेख, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, शिवसेनेचे शहर प्रमुख बंटी घोरपडे, काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिलका, सहा.पो.नि.प्रशांत साखरे, महेश मांढरे, मंगेश निरंजने व मोहित यांच्या कुटुंबियांनी व मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार आसिफराजा शेख यांनी मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकाची बोट बोलाविली व काही मासेमारी करणाऱ्या युवकांच्या मदतीने सोमवारी दिवसभर शोध मोहीम राबविली सायंकाळपर्यंत मृतदेह न मिळाल्याने मोहीम थांबविण्यात आली. मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मोहित याचा मृतदेह वर्धा नदीत तरंगतांना दिसला. हि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविला. पुढील तपास ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News