Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मनरेगाचे प्रलंबित 3 कोटी 80 लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करा

मनरेगाचे प्रलंबित 3 कोटी 80 लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करा

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर असलेल्या मजुरांना गेल्या अनेक दिवसांपासून कामाचा मोबदला मिळालेला नाही. मजुरी न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मनरेगाचे प्रलंबित 3 कोटी 80 लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची विनंती नागरिक करित आहे..

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक व वैयक्तिक स्वरुपाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परंतु माहे मे 2024 पासून ते आजपर्यंत या कामांवर असलेल्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे या मजुरांना जीवनावश्यक दैनंदिन गरजा भागविणे अतिशय कठीण होत आहे. याबाबत अनेक मजुरांच्या नाराजगी देखील होत आहेत. मजुरांचे प्रलंबित 3 कोटी 80 लक्ष रुपये बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे, अशी विनंती करत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित 3 कोटी 80 लक्ष रुपये मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी मनरेगा आयुक्तांना यापूर्वीच कळविले असल्याचेही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News