Monday, October 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना

विलोडा, कोंडेगाव व खुटवंटा येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी

चंद्रपूर : आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यासाठी भद्रावती तालुक्यातील विलोडा, कोंडेगाव व खुटवंटा या गावांमध्ये लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे.

या जलसंधारण उपक्रमात पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, नरेगा विभागाचे खोडे तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली.

वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचा उपलब्ध साठा वाढण्यास, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि भूजल पुनर्भरणास हातभार लागू शकतो. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागांसाठी अशा प्रकारचे जलसंधारणाचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

केवळ बंधारे उभारणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने स्थानिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे हाती घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विलोडा, कोंडेगाव व खुटवंटा येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणासाठी प्रशासनाचा पुढाकार आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना बळ मिळत असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News