Monday, September 21, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी Apprenticeshipच्या संधी वाढवा

WCLमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना संधी दिल्याचा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचा आरोप

प्रणयकुमार बंडी

चंद्रपूर : औद्योगिक आणि खाण क्षेत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ITI, Diploma, Engineering तसेच पदवीधर युवक शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील WCL, MIDC तसेच मोठ्या औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक युवकांना अपेक्षित संधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना भारतीय कामगार संघटनेने केला आहे.

भारत सरकारच्या NATS (National Apprenticeship Training Scheme) आणि NAPS (National Apprenticeship Promotion Scheme) या योजनेंतर्गत युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्टायपेंड मिळण्याची संधी उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्हा Board of Apprenticeship Training (Western Region), Mumbaiच्या कार्यक्षेत्रात येतो.

दरम्यान, WCLमध्ये 2026 साठी विविध ट्रेडमध्ये Apprenticeship भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या संधींचा अधिकाधिक लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना मिळावा, या मागणीसाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

स्थानिक युवकांसाठी जागा वाढविण्याची मागणी

निवेदनातून WCLच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी उत्तर आणि माजरी क्षेत्रात स्थानिक युवकांसाठी Apprenticeshipच्या जागा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच MIDCमधील सर्व कंपन्यांची बैठक घेऊन NATS/NAPS अंतर्गत उपलब्ध जागांचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली.

ITI, Diploma आणि Engineering विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन व नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली WCL, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार विभाग आणि ITI संस्थांची संयुक्त बैठक घेऊन Apprenticeshipसाठी वार्षिक लक्ष्य निश्चित करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे’

यावेळी संतोष पारखी यांनी चंद्रपूरच्या औद्योगिक विकासात स्थानिक नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत स्थानिक युवकांना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

“चंद्रपूरच्या जमिनीतून कोळसा निघतो, प्रदूषणाचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आणि रोजगाराच्या संधी मात्र बाहेरील लोकांना मिळत असतील, तर हा प्रश्न गंभीर आहे. WCL आणि MIDCमधील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना Apprenticeshipच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार युवकांचा मोर्चा काढण्याचा इशाराही संतोष पारखी यांनी दिला.

या निवेदनाच्या प्रती कौशल्य विकास आयुक्त, नवी मुंबई, BOAT मुंबई, WCLचे महाव्यवस्थापक तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडेही पाठविण्यात आल्या आहेत.

स्थानिक युवकांना प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, WCL आणि जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी समन्वयाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News