घुग्घुस, चंद्रपुर : येथील रहिवासी स्मृतिशेष महादेव सिताराम मोडक यांचे आज रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंतिम संस्कार आजच, रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 4:00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून (पंचशील चौक, विद्या टॉकीज रोड, हेमंत झेरॉक्स जवळ, घुग्घुस) येथून बौद्ध स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
मोडक यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घुग्घुस परिसरात शोककळा पसरली आहे.




