Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्वच्छता ही सेवा अभियान ग्रामपंचायतीने प्रभावीपणे राबवावे – पुलकित सिह

अभियान कालावधी दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025

चंद्रपूर – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि. 17 सप्टेंबर 2025 ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावी पणे राबवावी. असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपुरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी केले आहे.

या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2025 साठी “स्वच्छोत्सव ” ही थीम निश्चित केली आहे. खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवुन करण्यात आहे.

स्वच्छता लक्ष युनिट (CTUs) – अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन सदर ठिकाणांची मॅपिंग आणी साफ़सफ़ाई करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता – संस्था/ प्रतिष्ठान व जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

सफ़ाईमित्र सुरक्षा शिबिरे – सफ़ाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबविल्या जाणार असुन, या मध्ये सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व सफ़ाई मित्रांची आरोग्य तपासणी साठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करुन,आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्पचे आयोजन करुन,वैयक्तीक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सफ़ाई मित्रांना देण्यात येणार आहे.

क्लीन ग्रीन उत्सव – पर्यावरणपुरक व शुन्य कचरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

प्रबोधनपर उपक्रम – स्वच्छ सुजल गाव, कच-यापासुन कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फ़ुड, केंद्र ईत्यादी.

एक दिवस एक घंटा एक सोबत – या उपक्रमां अंतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असुन, या उपक्रमात चंद्रपुर जिल्यातील सर्व गाव स्तरावरील सर्व घटकांना सहभागी करुन मोठ्या स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव आणी स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभेद्वारे घोषित करता येतील. या विशेष ग्रामसभा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधित कधीही आयोजित करता येणार आहे. या द्वारे मोहिम कालावधित जास्तीत जास्त गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव आणी स्वच्छ सुजल गाव म्हणुन घोषीत करणार आहे.

स्वच्छता ही सेवा 2025 मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या IT पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in/) अपलोड करण्याची सुविधा असल्यामुळे ,चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सर्व उपक्रमांचे याद्वारे शासन स्तरावरुन सनियत्रंण केल्या जाणार आहे.

सदरील उपक्रम ग्रामपंचायत यांनी प्रभावी पणे राबविण्यात यावे . असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपुर चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह व जल जिवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News