चंद्रपूर : माढेळी-वरोरा रोडवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान बनावट व अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 90 मि.ली.च्या ‘रॉकेट’ ब्रँडच्या देशी दारूच्या एकूण 150 पेट्या व त्यासाठी वापरण्यात आलेले MH27-X-8210 क्रमांकाचे पिकअप वाहन असा एकूण ₹21,15,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. आरोपीने बनावट देशी दारू वाहतूक करताना पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी संपूर्ण मालासह वाहन ताब्यात घेतले.
याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.




