Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस : बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात अभिवादन व फळवाटप

घुग्घुस, चंद्रपूर : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत लोकप्रिय खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिशा वृद्धाश्रमात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, एससी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, विजय माटला, सुनील पाटील, दिपक कांबळे, कपिल गोगला, कुमार रुद्रारप, अंकुश सपाटे, दिपक पेंदोर, अरविंद चहांदे, गणपत लभाने तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News