Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पालकमंत्री संजय सावकारे यांचा भंडारा जिल्हा दौरा: रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी घेतला आढावा

भंडारा: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज भंडारा जिल्ह्यातील भंडारा सिल्क उद्योग प्रा.लि., कान्हलगाव (ता. मोहाडी) आणि रेशीम मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथे भेट देऊन ऑटोमॅटिक रेलिंग युनिट आणि टसर व तुती रेशीम उद्योग केंद्राची पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी रेशीम शेती उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजना, उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यातील संधी यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी बोलताना संजय सावकारे यांनी रेशीम शेती ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा उद्योग कृषी संलग्न असून, अल्पकालावधीत अधिक नफा मिळवून देणारा आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा आहे.”

राज्यातील रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या दौऱ्यात स्थानिक शेतकरी, उद्योजक आणि वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News