मुंबई: चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या मागणीला यश मिळाले आहे. गुरुवारी मुंबईतील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत एचबीसीसी कंपनीला 57 कोटी रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधी नियोजन करण्याचा निर्णय झाला.
या निर्णयामुळे चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग आला आहे. परिणामी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना लवकरच उत्तम आणि अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.




