Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन समारंभ

नागपुर : आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उपस्थित राहून आदिवासी युवकांना प्रेरणादायी संदेश दिला. नागपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, “आपल्या कौशल्याला पुढील स्तरावर नेण्यासाठी मेहनत आणि समर्पण गरजेचे आहे. आत्मनिर्भरता आणि यशासाठी आपल्या क्षेत्रात पारंगत होणे ही काळाची गरज आहे.”

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनीही आपल्या भाषणात आदिवासी मुलांच्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, “राज्यस्तरीय स्पर्धा ही मुलांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येतील. अशा स्पर्धांमुळे त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळेल.”

या कार्यक्रमात आदिवासी युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून, त्यातून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवी दारे खुली होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News