अमरावती : चिखलदरा हे थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून, दरवर्षी नववर्ष साजरे करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दि. 31 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत वाहतुकीच्या वाढत्या गर्दीमुळे अपघात व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे.
वाहतूक मार्गामध्ये बदल:
1. 31 डिसेंबर 2024 सकाळी 8:00 वाजेपासून 1 जानेवारी 2025 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत परतवाडा ते चिखलदरा मार्गावर वाहतूक एकमार्गी केली जाईल.
जाण्यासाठी मार्ग: परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा
परतीसाठी मार्ग: चिखलदरा ते घटांग मार्गे परतवाडा
महत्त्वाचे निर्देश:
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे व दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
सुरक्षितता व वाहतुकीची सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पर्यटकांनी याचा आनंददायी प्रवासासाठी लाभ घ्यावा.




