Friday, July 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

15 डिसेंबर पर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर 16 डिसेंबरला भव्य मोर्चा

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये दूध आंदोलन पपेटनार

देऊळगाव राजा : गेल्या अनेक दिवसापासून दुग्ध व्यवसाय हा पूर्णपणे तोट्यामध्ये असून बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतीला जोडधंदा म्हणून ज्या काही योजना राबविल्या जातात त्यातील हा मुख्य दूध व्यवसाय असून हा दूध व्यवसाय आज रोजी प्रायव्हेट दूध संघ दूध खरेदी करत असल्यामुळे प्रति लिटर 25 रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च सुद्धा वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. आता नवीन शेतकऱ्याचं सरकार आलं असल्याने शेतकऱ्याची मागणी आहे प्रति लिटर 35 रुपये भाव द्यावा, तुमच्या कुठल्याही योजना आम्हाला नकोय फक्त आमच्या मालाला हमीभाव द्या आणि शासन स्तरावर शासकीय दुध डेऱ्या चालू करून शेतकऱ्यांचा दूध खरेदी करा म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव मिळेल आणि शेतीला जोड धंदा हा चांगला राहील आणि गाय म्हैस या जनावराला शासन स्तरावर शंभर टक्के अनुदानावर इन्शुरन्स विमा काढण्यात यावा आणि जनावरांना लागणारी ढेप आणि सुग्रास यासारखे खाद्याला 80 टक्के सबसिडी मिळावी. दूध व्यवसाय सुरू राहील, सदर मागण्याचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले, 15 तारखेपर्यंत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 16 तारखेला उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा येथे भव्य दूध आंदोलन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे.

यावेळी बालाजी सोसे, छगन माने, ज्ञानेश्वर मुळे, गजानन लबडे, सुदाम राऊत, संदीप राऊत, प्रवीण माने, अमोल वाघमारे, निवेदन देताना उपस्थित होते म्हणून या आंदोलनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News