Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना

20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत करता येणार मतदान

परभणी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर व पाथरी या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले.

परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ठेवण्यात आलेले मतदान साहित्य परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. यावेळी निवडणूक निरीक्षक के. हरिता, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे हे यावेळी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News